Good news खानापूर तालुक्याला दिलासा, आज दिवसभरात केवळ २१ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह

विटा (प्रतिनिधी)
        सांगली जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागातील कोरोना ग्रस्तांच्या आकडेवारीत काही प्रमाणात घट होत आहे. आज शुक्रवार ता. २५ रोजी खानापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ पर्यंत मर्यादित राहिल्याचे समाधानकारक चित्र आहे.
        खानापूर तालुक्यात आज विटा शहर - 14, खानापूर-4, शेडगेवाडी-2 आणि बलवडी (भा.)-1 असे आज शुक्रवारी 21 रुग्णांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे.खानापूर तालुक्यात आज अखेर 1533 रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यापैकी 916 रुग्णानी कोरोना वर मात केली आहे तर 574 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत 43 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

Post a comment

0 Comments