Daily Mahasatta

Daily Mahasatta

GOOD NEWS सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी विक्रमी १०१९ रुग्ण कोरोना मुक्त

: आज दिवसभरात ७४९ पाॅझीटीव्ह 

सांगली ( राजेंद्र काळे )
        सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी विक्रमी १०१९ रुग्णानी कोरोना वर यशस्वीपणे मात केली आहे. आजपर्यंत कोरोना मुक्त होणारांचा हा एकाच दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. तसेच आज दिवसभरात ७४९ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
       सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दररोज नवनवीन आकडे समोर येत आहेत. मात्र आज मंगळवार ता.१५ रोजी १०१९ इतक्या मोठ्या संख्येने रुग्णानी कोरोना वर मात केली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तर आज ७४९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात २१२ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर १४० तर मिरज शहरातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ३८, जत -२८, कडेगाव -३६, कवठेमंकाळ -४६, खानापूर -४३ , मिरज- ६१, पलूस- ४८, शिराळा- ३७, तासगाव- ३१ आणि वाळवा -१६९ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
         आजपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ७८८ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये १४ हजार ८२४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सध्या ९ हजार ३३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यातील ९३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

1 Comments

  1. अजूनही काळजी घ्यायला हवी...

    ReplyDelete