Daily Mahasatta

Daily Mahasatta

Good News सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी विक्रमी ८७५ रुग्ण कोरोनामुक्त

: आज दिवसभरात ९३६ रुग्ण पाॅझीटीव्ह
सांगली ( राजेंद्र काळे )
        सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ८७५ इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज ९३६ नवीन रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील आज अखेरचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ हजार ३७० इतका झाला आहे.
         सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दररोज नवनवीन आकडे समोर येत आहेत आज शुक्रवार ता.११ रोजी ९३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात २१० रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर १३७ तर मिरज शहरातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ७१, जत -४५, कडेगाव -७९, कवठेमंकाळ -७८, खानापूर -६०, मिरज-७४, पलूस- ८५, शिराळा- ३९, तासगाव- ६८ आणि वाळवा -१२४ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
         आजपर्यंत जिल्ह्यातील २१ हजार ३७० रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ११ हजार ६२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सध्या ८ हजार ९५० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यातील ७९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज एकाच दिवशी सर्वांधिक ८७५ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर आज ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments