Daily Mahasatta

Daily Mahasatta

Good News विटा पालिका 50 बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार - अॅड. वैभव पाटील


सांगली (राजेंद्र काळे)
            कोरोनाच्या भीषण संकटात विटा आणि परिसरातील नागरिकांसाठी विटा नगरपरिषदेच्या वतीने 50 बेडचे सुसज्ज कोव्हीड  सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी दिली आहे. या कोव्हीड सेंटरमुळे हजारो रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.
         सांगली जिल्ह्यासह खानापूर तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर विटा परिसरात देखील  दिवसाला 50 ते 60 नवीन रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.  विट्यातील रुग्णालय फुल्ल झाल्यामुळे अनेक रुग्णांना सांगली, मिरज, कराड या ठिकाणी हलवावे लागत आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीवदेखील गमावला आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये माजी आमदार अॅड सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा  नगरपरिषदेने सुसज्ज असे कोव्हीड  सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सात दिवसात हे कोव्हीड  सेंटर लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे. 
             याबाबत माहिती देताना अॅड. वैभव पाटील म्हणाले, या बिकट परिस्थितीमध्ये सर्व सामाजिक संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये विटा नगरपरिषद सुद्धा कमी पडणार नाही. येत्या काही दिवसातच 50 बेडचे  सुसज्ज असे कोविड  सेंटरची उभारणी करणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये दोन व्हेंटिलेटर, दोन ड्यूरा सिलेंडर, दोन ऑक्सीजन फ्लो मशीन, पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन, 50 बेडपर्यंत ऑक्सिजनची पाईपलाईन, एक ईसीजी मशिन, पी पी इ किट, सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज, इन्व्हर्टर, 50 तयार बेडची उपलब्धता अशा सर्व सोयीयुक्त कोविड  सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.
        या हॉस्पिटल मध्ये लोकनेते मा हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श नर्सिंग स्कूल हे सर्व नर्सिंग स्टाफ पुरणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन वैद्यकीय सेवा पुरणार आहेत. विटा नगर परिषदेच्या या  उपक्रमासाठी नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार देण्याची तयारी दर्शविली आहे. विटा सराफ असोसिएशनने दोन लाख लाख रुपये,  कै. आनंदराव शेठ देवकर यांच्या स्मरणार्थ साहिल व शुभम  देवकर यांनी पाच लाख  रुपये देण्याचे ठरविले आहे.
         खासदार संजय काका पाटील सर्व प्रशासकीय यंत्रणा पुरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व श्रेयस उद्योगसमूहाचे अध्यक्ष बाबासाहेब मुळीक, मनमंदिर उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक गायकवाड, विटा  यंत्रमाग असोसिएशन,  विविध व्यापारी संघटना गलाई बांधव या उपक्रमासाठी भरगोस अशी मदत करणार आहेत. विटा नगरपरिषद शाळा नंबर 2 येथे फीवर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आलेली आहे याचाही सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी अँटीजेन्ट टेस्ट करण्यासाठी 2000 टेस्टिंग किटची उपलब्धता करून दिलेली आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले
          यावेळी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, किरण तारळेकर, फिरोज तांबोळी, संजय तारळेकर,  दहाविर शितोळे,  अविनाश चौथे, संजय सपकाळ, प्रशांत कांबळे,  विनोद पाटील,  अमित भोसले,  विकास जाधव, पांडुरंग पवार, माधव रोकडे गोरख लाटणे,  मैनुद्दीन पठाण, इजाज मुल्ला तसेच मान्यवर उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments