Daily Mahasatta

Daily Mahasatta

स्पीड पोस्टाने मास्कचे वाटप, मंत्री जयवंतराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम

 नोकरी किंवा कामा निमित्त बाहेरगावी असणाऱ्या कुटुंबाना स्पीड पोस्टद्वारे मास्क किट पाठविताना बुथ अध्यक्ष रणजीत तेवरे,आकाश डोंगरे, हर्षल शिंगाडे, प्रशांत उर्फ बंटी उरुणकर,आकाश साळुंखे.

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे )
       इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील शेवटच्या कुटुंबापर्यंत मास्क किट पोहचावा, असे आवाहन युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबास युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी मोफत मास्क किट देण्याची व्यवस्था केली आहे.
         इस्लामपूर येथील बुथ क्रमांक ७४ मधील नागरिकांना बुथ अध्यक्ष रणजीत तेवरे, हर्षल शिंगाडे, प्रशांत उर्फ बंटी उरुणकर, आकाश साळुंखे, आकाश डोंगरे व कार्यकर्ते हे मास्क किटस वाटप करीत आहेत. यावेळी ते सोशल डिस्टंसिंग, हाताची स्वच्छता आणि मास्कचे महत्व पटवून देत आहेत. या भागातील बरीच कुटुंबे नोकरी किंवा कामानिमित्त बाहेरगावी आहेत. या संदर्भात प्रतिकदादांशी चर्चा केली असता,त्यांनी अशा कुटुंबाना स्पीड पोस्टद्वारे मास्क किट पाठविण्याचे सुचवले. त्यानुसार स्पीड पोस्टद्वारे मास्क किट पाठविली आहेत.
        रणजित तेवरे म्हणाले,मास्क वापरल्याने तोंडातून, हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकते. तसेच शिंकताना किंवा खोकताना नाकातून किंवा तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्याद्वारे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो.शिवाय आपला हात तोंडाला लागूनही संसर्ग होवू शकतो. त्यास आळा बसू शकतो.
■■■■■■■

Post a Comment

0 Comments