Daily Mahasatta

Daily Mahasatta

व्यापार्यास मारहाण करत एक लाखाचा मुद्देमाल लुटला, पाहा मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ

 


जत ( नितीन टोणे )

व्हसपेठ ता. जत येथील हनुमान स्टीलस्  अँड  सर्व्हिसेस च्या राजस्थानी व्यापाऱ्यास चौघा अज्ञात  चोरट्यांनी लोखंडी राॅडने मारहाण करून फरशी डोक्यात घालण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. चोरटय़ांनी लुबाडण्याच्या उद्देशाने प्राण घातक हल्ला केला. मूळ राजस्थानातील असलेल्या हिराराम वालाजी चौधरी रा.व्हसपेठ असे  मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या कडील  दोन तोळ्याची सोन्याची चैन व मोबाईल असा एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली . घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

        घटनास्थळावरून  मिळालेली माहिती अशी  , हिराराम चौधरी यांच्या मालकीचे व्हसपेठ हद्दीत माडग्याळ रोडवर हनुमान स्टीलचे दुकान आहे . सायंकाळी चौधरी हे दुकानात असताना काही अज्ञात चोरटे तेथे आले. त्यांनी एकदम चौधरी यांच्या वर लोखंडी राॅडने हल्ला  करण्यास सुरुवात केली. . प्रसंगावधान राखून चौधरी यांनी राॅड तसाच धरून ठेवला . तर दुसऱ्याने शेजारील फरशी त्यांच्या डोक्यात घातली  . यात चौधरी हे जखमी झाले. दुकानातली दोघे नोकर त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले असता त्यांना ही जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळवून लावले. या घटनेनंतर चौघेही घटनास्थळारुन फरार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली  असून भीतीचे वातावरण पसरले आहे. म ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे .जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे . अधिक तपास जत चे पोलीस करत आहेत.

 

 

 

Post a Comment

0 Comments