Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुस्लीम समाजाने उभारलेल्या कोव्हीड सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचतील : युवानेते प्रतिक पाटील

 इस्लामपूर : येथे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उभारत असलेल्या केअर सेंटरला भेट देवून माहिती घेताना प्रतिकदादा पाटील. समवेत पिरअली पुणेकर, व कार्यकर्ते.

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
          इस्लामपूर येथील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, व दानशूर व्यक्ती येथील ख्रिश्चन बंगला परिसरात अद्यावत केअर सेंटर उभा करीत आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी या केअर सेंटरला भरीव मदत केली आहे. मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी उभारलेल्या या कोव्हीड सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचतील असे मत युवानेते प्रतिक पाटील यांनी व्यक्त केले.
         इस्लामपूर येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील चाँदतारा मोहल्यातील मदरसामध्ये हे अद्यावत केअर सेंटर उभा राहत आहे. ना.जयंतराव पाटील यांनी ५ लाख रुपये,तर प्रतिकदादा पाटील यांनी १०० बेड दिले आहेत. समाजातील अनेक दानशूर हात या कामासाठी पुढे आलेले आहेत.
या सेंटरमध्ये आयसीयू, ऑक्सिजन,जनरल अशी व्यवस्था आहे. यामध्ये पत्रकार,पोलीस,व दानशूर व्यक्तींच्यासाठी प्रत्येकी २ बेड राखीव ठेवले आहेत. एक्स रे मशीन सह अद्यावत सुविधा केल्या आहेत. डॉ.फरीद आत्तार,डॉ.शाहिद कादरी, डॉ.रियाज ढालाईत यांच्यासह पुणे येथील ४ डॉक्टरांची टीम हे काम पहाणार आहे.
          प्रतिकदादा पाटील यांनी सेंटरला भेट देवून कामाची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक पिरअली पुणेकर,माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांच्यासह समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या सेंटरला साधारण रुपये २५ लाख खर्च आला असून सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. ना.जयंतराव पाटील, प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते येत्या १०-१२ दिवसात उदघाटन केले जाणार आहे.
माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,अल्ताफ मोमीन( सर),हाजी मुबारक इबुशे,हिदायतुल्ला जमादार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष शकील जमादार, अश्पाक पुणेकर, अबुवकर फकीर, इस्माईल पुणेकर,अजहर जमादार, जावेद ईबुशे यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, व दानशूर व्यक्ती केअर सेंटर उभा करण्यासाठी राबत आहेत.

Post a Comment

0 Comments