Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचार्यांचे जंगी स्वागत

विटा : कोरोना मुक्त झालेल्या पोलीस कर्मचार्यांचे  पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले.

सांगली (राजेंद्र काळे)
        विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस हेड काॅन्सटेबल प्रकाश सिताराम निकम व पोलीस कॉन्सटेबल अंकुश रंगराव लुगडे  या दोन कर्मचाऱ्यांनी नुकतीच कोणावर मात केली यावेळी कर्तव्यावर हजर होण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांचे विटा पोलीस ठाण्याच्या वतीने पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले.
       विटा पोलीस ठाण्यातील विटा पोलीस ठाण्यातील प्रकाश निकम आणि अंकुश लुगडे या पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरूना चाचणी 23 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु होते. आज आज हे कर्मचारी पूर्ण मुक्त होऊन आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस उपनिरिक्षक पी. के. कन्हेरे यांच्याहस्ते पुष्प गुच्छ देऊन या सर्व आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी निकम आणि लुगडे यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
        कोरोनाचे रुग्ण म्हणून पोलीस ठाण्यातील आपले सहकारी कशी वागणूक देणार? याची चिंता मनात असतानाच आज या दोन्ही कर्मचार्यांवर फुलांची उधळण करत जंगी स्वागत झाल्याने ते दोघेही भारावून गेले होते. या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचार्यांनी आपले अनुभव सर्वांना सांगितले. कोरोनावर मात केलेल्या या कोव्हीड योद्धांच्या अनोख्या स्वागताची शहरात चांगली चर्चा होत आहे.
......................................
चौकट :
पोलीस हेच आपले कुटुंब
असल्याचा अभिमान वाटला...
          : आम्हाला पोलीस स्टेशन आणि त्यामधील कर्मचारी हेच आपले कुटुंब वाटत असते. आज कोरोना मुक्त होउन आल्यानंतर अन्य सहकारी आपल्या सोबत कसे वागणार ? असे वाटत होते. मात्र पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके साहेब आणि अन्य सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच पुष्पवृष्टी करून अनोख्या पद्धतीने स्वागत केले. आज पोलीस हे आपले कुटुंब मानत असल्याचा तसेच पोलीस सेवेत काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो.
          अंकुश लुगडे,
          पोलीस काॅन्सटेबल, विटा.

विटा : कोरोना मुक्त झालेल्या प्रकाश निकम आणि अंकुश लुगडे या पोलीस कर्मचार्यांचे स्वागत करताना पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि पोलीस उपनिरिक्षक पी. के. कन्हेरे.


 

Post a Comment

0 Comments