Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटेकरांसाठी आज ' सुपर संडे ' ; एकही रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह नाही

सांगली (राजेंद्र काळे)
        आज प्राप्त झालेल्या कोरोनाच्या २० रिपोर्ट मध्ये विटा शहरातील एकाही रुग्णाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला नाही. तसेच विटा ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेच्यावतीने घेण्यात येणार्या अँटिजन टेस्ट देखील न झाल्यामुळे विटा शहरातील कोरोनाग्रस्तांचा स्कोअर बोर्ड आज कोरा राहिला आहे. त्यामुळे विटेकरांसाठी किमान आजचा रविवार सुपर संडे ठरला असे म्हणावे लागेल.
          तालुक्यात दररोज 60 ते 70 नवीन कोरनाग्रस्त रुग्णांची भर पडत आहे. तसेच विटा शहरात देखील 40 ते 50 रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रुग्णांची वाढ केंव्हा कमी येणार? तसेच विटा शहर पूर्णतः कोरोना मुक्त कधी होईल? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. आज दिवसभरात 20 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये विटा शहरातील एकाही रुग्णाचा समावेश नाही. तसेच आज विटा ग्रामीण रुग्णालय आणि विटा नगरपालिका यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अँटिजन टेस्ट देखील बंद असल्यामुळे विटा शहरातील कोरोना वाढीचा आकडा शुन्य राहिला.
           कोरोनाचे संकट जाऊन विटा शहर कोरोना मुक्त केंव्हा होणार? याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे किमान आजचा दिवस तरी विटेकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. या सूपर संडे प्रमाणे विटा शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कायमचा शून्यावर येऊन शहरासह तालुका लवकरच कोरोनामुक्त व्हावा; अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
.................................
आज दिवसभरातील पाॅझीटीव्ह रुग्ण

: भाळवणी-7 कार्वे- 5, गार्डी -2 आणि कुर्ली , धोंडगेवाडी, जाधववाडी, बलवडी, वासुंबे, माहुली येथील प्रत्येकी 1 असे 20 रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील 1037 रुग्णाचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. यापैकी 627 रुग्णावर उपचार सुरू आहेत तर एकूण 31 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.Post a Comment

0 Comments