कोरोना झालाय ? बेड मिळत नाही? विटेकरांनो..घाबरु नका, ऑक्सीजन मशीनच येणार आपल्या दारी...

 


: विटा बचाव कोरोना समितीचा नागरिकांना मोठा दिलासा

सांगली (राजेंद्र काळे)
         विटा शहरासह सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेकडो लोकांना ऑक्सीजन मशीन आणि व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. अशावेळी विटा बचाव कोरोना समिती रुग्णाच्या मदतीसाठी देवदूत बनून धावून आली आहे. कोरोना झालाय, पण ऑक्सीजन बेड मिळत नाही अशा रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी विटा बचाव कोरोना समितीने पाच ऑक्सीजन मशीन आणल्या असून रुग्णाच्या घरी पोहचून त्यांना ऑक्सीजन पुरवठा केला जाणार आहे.
         ' प्राणवायू आपल्या दारी ' या उपक्रमामध्ये   विटा बचाव करोना समितीच्या पाच मशीन लोकांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ज्या लोकांना ऑक्सिजन ची गरज आहे व ज्यांना बेड उपलब्द्धता होत नाही, अश्या लोकांना डॉकटरांच्या सल्ल्याने त्यांच्या घरी ऑक्सीजन लावता येईल असे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन समिती तर्फे देण्यात येतील. त्यातील आज पाच मशीन विट्यात आलेल्या आहेत. उर्वरित आणखी मशीन सोमवार पर्यंत दाखल होतील, अशी माहिती समितीने दिली आहे.
     ऑक्सीजन मशीन साठी संपर्क-
सुनिल सुतार      9422323696,
विकास जाधव।   9960543254
विजय सपकाळ   9272135986
कृष्णा देशमुख    8668701299
गजानन सुतार    9922380838
साजिद आगा।   9975683001
प्रशांत पाटील।   9049156999
माधव रोकडे।    9405575477
अनिल म बाबर  9822284362
भालचंद्र कांबळे  9860980123
शिवप्रसाद सुतार 7020485233
विजय पाटील      9673470007
विनोद पाटील     9881900888
अमित भोसले   9822540865
दिलीप आमने   8857052557

Post a comment

0 Comments