Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेचे उपायुक्त म्हणून राहुल रोकडे यांनी आज पदभार स्वीकारला

सांगली (राजेंद्र काळे)
            सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे उपायुक्त (मुख्यालय) म्हणून राहुल रोकडे यांनी आज पदभार स्वीकारला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन रोकडे यांनी मुख्यालयात येऊन पदभार स्वीकारला.
    राहुल रोकडे हे मुळचे विटा येथील रहिवासी असून  सध्या ते पलूसचे गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. सांगली महापालिका मुख्यालय उपायुक्त राजेंद्र तेली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या उपायुक्त पदावर राहुल रोकडे यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली होती. आज उपायुक्त म्हणून राहुल रोकडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सहायक लेखापाल धोंडीराम संकपाळ, सिराज नायकवडे, वृषाली अभ्यंकर, प्रमोद रजपूत, स्वीय सहायक संदीप कोळी, अशोक सांगले, प्रकाश चव्हाण, राजू चव्हाण आदींनी नुतून उपायुक्त राहुल रोकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
   यावेळी बोलताना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच प्रलंबित योजना मार्गी लावण्याचा मानस उपायुक्त राहुल रोकडे यांनी व्यक्त केला. 


 

Post a Comment

0 Comments