Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वांगीची कु. सुविधा सावंत राज्यात प्रथम

 

: गटशिक्षणअधिकारी आनिस नायकवडी यांच्याहस्ते  पुरस्कार प्रदान

कडेगाव ( सचिन मोहिते)
           एमपीएससी व युपीएससी आयोगाच्या अभ्यासक्रमावर आधारित डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद जालना यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या दुसरी ते नववीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय टॅलेंट सर्च (आर. टी. एस. परीक्षा२०२०) महाराष्ट्र राज्याच्या निकालामध्ये कडेगाव तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये आय. एस. ओ. मानांकन प्राप्त सिद्धनाथ क्लासेचीची इयत्ता ९ वी ची विद्यार्थींनी कु. सुविधा नामदेव सावंत हिचा राज्यात प्रथम क्रमांक तर कु. आयान फिरोज शिकलगार इयत्ता ४थी जिल्ह्यात प्रथम, कु. सायली शिवाजी जाधव इयत्ता ८ वी जिल्ह्यात तृतीय कु. प्रिया सुरेश तांदळे इयत्ता ६ वी जिल्ह्यात तृतीय क्रमांक संपादन केले आहेत.
         यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश, मेडल, स्मृतिचिंन्ह व प्रमाणपत्र देउन कडेगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आनिस नायकवडी यांच्याहस्ते गौरवण्यात आले. तसेच जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर  विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व कर्मवीर भाऊराव पाटील  उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार शेखर मोहिते सर यांना देण्यात आला. याप्रसंगी शेखर मोहिते यांचाही गटशिक्षण अधिकारी मा. अनिस नायकवडी पंचायत समिती कडेगाव  यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी सुरेश तांदळे , नामदेव सावंत, शिवाजी जाधव यांचेसह पालक उपस्थित होते .Post a comment

0 Comments