Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत येथे शासनाने मका व उडीद खरेदी केंद्र सुरु करावे : मा. प्रकाश जमदाडे

जत : येथे राज्यशासनाने मका - उडीद खरेदी केंद्र सुरु करावे असे निवेदन देताना केंद्रीय रेल्वे बोर्ड पुणे विभागाचे संचालक मा. प्रकाश जमदाडे व इतर.

जत ( नितीन टोणे)
         राज्यशासनाने जत येेेथे मका खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जत मार्केट कमिटीचे मा. सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक मा. प्रकाश जमदाडे यांनी निवेदनद्वारे नायब तहसीलदार विभुते यांच्याकडे केली आहे
         याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जत तालुका हा सीमाभागातील अत्यंत दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका महाराष्ट्रतील सर्वात मोठा तालुका असून 53 गावे खरीप तर 67 गावे रब्बी पिकाखाली आहेत. तालुक्यातील खरीप क्षेत्र 45000 हेक्टर पेरणी झालेले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील अनेक शेतकरी हक्काचे पीक म्हणून मका आणि उडीद पेरणी करीत आहेत. यावर्षी देखील काही भागात पाऊस चांगला झाला आहे. शेतकऱ्यांनी साधारणपणे 5000 हेक्टर क्षेत्र उडीद व 7000 हेक्टर क्षेत्र मका पेरणी केली आहे. पाऊस चांगला असल्याने उत्पादन देखील चांगले आले आहे. राज्यशासनाने उडीद हमीभाव 6100 रुपये तर मका 1760 रुपये जाहीर केला आहे. 
        परंतु व्यापाऱ्यांकडून उडीद 4500 ते 5200 रुपये तर मका 1200 ते 1350 या दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे जत व परिसरातील उत्पादित केलेले पीक हे येथेच शेतकऱ्यांना विकता किंवा खरेदी करता यावे यासाठी राज्यशासनाने खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जत मार्केट कमिटीचे मा. सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक मा. प्रकाश जमदाडे यांनी निवेदनद्वारी नायब तहसीलदार विभुते यांच्याकडे केली आहे यावेळी निगडी (खुर्द ) चेरमन बाळकृष्ण शिंदे. माजी सरपंच अशोक गायकवाड. सचिन माने उपस्तितीत होते

Post a Comment

0 Comments