जत शहरासह तालुक्यातून जनता कर्फ्युला प्रतिसाद

जत /प्रतिनिधी 
         जत शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाची साखळी रोखण्यासाठी जत शहर कोरोना नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या जनताकर्फ्यु ला आज जत शहरवासियांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे
          जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे सहाशेच्या आसपास रूग्ण आढळून आले आहेत. या पैकी २७ कोरोनाबाधित रूग्णांचे बळी गेले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची जत शहरासह तालुक्यातील संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनापुढे हा एक चिंतेचा विषय झाला आहे.
          जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, तसेच तालुक्यातील महसुल प्रशासन यांच्या सहकार्यामुळे दहा दिवसांचा हा जनताकर्फ्यु आम्ही शंभर टक्के यशस्वी करू व जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडून जत शहरासह तालुक्यातील कोरोनाचे संकट दूर करू असा आम्हाला विश्वास आहे .या साठी जतशहरवासियांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन ही संजय कांबळे यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments