विटा शहरात आज २० पाॅझीटीव्ह

विटा ( राजेंद्र काळे)
         खानापूर तालुक्यात आज गुरुवार ता. २४ रोजी एकूण ३३ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये विटा शहरातील २० रुग्णांचा समावेश आहे.
         खानापूर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याची दिलासादायक माहिती पुढे येत आहे. आज तालुक्यात 33 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये विटा शहरातील २० रुग्णांचा समावेश आहे तसेच सुलतानगादे, घानवड, ढवळेश्वर, कलेढोण, माहुली, आळसंद , ऐनवाडी, खानापूर येथील प्रत्येकी एक तसेच हिंगणगादे आणि भिकवडी गावातील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. विटा शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
         खानापूर तालुक्यात आजअखेर १५१२ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यापैकी ८८२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे तर ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील आजपर्यंत ४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments