हुतात्मा कारखान्याच्यावतीने अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप

वाळवा ( रहीम पठाण )
         पद्मभूषण क्रांतिवीर डाॕ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि., यांचे वतीने मसुचीवाडीमध्ये आर्सेनिक अल्बम 30 औषध व हँड सॕनीटायझर चे वाटप करण्यात आले.
         महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आपल्या कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक सदस्याची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम 30 औषध व हँड सॕनीटायझर चे वाटप कारखान्याचे चेअरमन मा.वैभवकाका नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबात वाटप करण्यात येत आहे.
         आज मसुचीवाडी ता.वाळवा येथे प्रत्येक घरात जाऊन याचे वाटप करण्यात आले.व त्याची योग्य अशी माहीती दिली जात आहे. प्रत्येकाने योग्य खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे जेणे करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल असे आवाहन हुतात्मा कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a comment

0 Comments