Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात कार ने धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू


इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
     पेठ ता.वाळवा येथे दारूच्या नशेत स्विफ्ट डिझायर चालकाने सायकलीवरील शाळकरी मुलास जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पेठ शिराळा रोडवरील मराठी शाळेजवळ असलेल्या इदग्याशेजारी दु. १२ च्या सुमारास हा अपघात झाला. यात मयत झालेल्या शाळकरी मुलाचे नाव रितेश राजेंद्र जाधव (वय-१३)असे आहे. याबाबतची तक्रार रितेश याचे चुलते सतीश बाजीराव जाधव यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
    इस्लामपूर पोलीस व घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रितेश हा रोजगारासाठी गेलेले आपल्या आईवडिलांना भेटून घरी परतत होता. त्याच्या घराजवळ शिराळा रोडवर हा अपघात झाला. शिराळा रोडने भरधाव वेगाने येत असलेली स्विफ्ट डिझायर क्र. एमएच ११ बिव्ही ३८०१ या गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने रितेश याच्या सायकलला जोराची धडक दिली. तो जागेवरच पडला होता. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषित केले.चालक धर्मराज भगवानराव देशमुख( वय-४२ )रा.गोपाळपेठ, सातारा याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने संपूर्ण पेठ गावावर शोककळा पसरली. अपघात झालेल्या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.पेठ गावातील नागरिकांच्यात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत. 


 

Post a Comment

0 Comments