विट्यातील डाॅक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू

विटा प्रतिनिधी
        येथील डाॅ. धनंजय फाळके वय-37 (रा. हणमंतनगर, खानापूर रोड, विटा ) यांचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डाॅ फाळके यांच्यावर तासगाव येथील कोव्हीड रुग्णालयात उपचार सुरु होते.
        डाॅ. फाळके हे गेल्या आठवड्याभरापासून आजारी होते. त्यांच्यावर विटा येथील हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू होते. विटा शहरात ऑक्सीजन बेड न मिळाल्याने त्यांना तासगाव येथील कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती. काल बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. 

Post a comment

0 Comments