Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज उच्चांक, ११७४ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह

:आज २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
सांगली ( राजेंद्र काळे)
        सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ११७४ इतक्या उच्चांकी रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आज अखेरचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २० हजार ४३४ इतका झाला आहे.
         सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दररोज नवनवीन आकडे समोर येत आहेत आज गुरुवार तारीख १० रोजी ११७४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात ४०२ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर २९९ तर मिरज शहरातील १०३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ५१, जत -५३, कडेगाव -५८, कवठेमंकाळ -४४, खानापूर -६०, मिरज- १७२, पलूस- ७४, शिराळा- ३७, तासगाव- ६२ आणि वाळवा -१६१ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
          आजपर्यंत जिल्ह्यातील २० हजार ४३४ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये १० हजार ७४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सध्या ८ हजार ९२५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यातील ७६२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ४४७ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर आज २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments