Daily Mahasatta

Daily Mahasatta

कमळापुर सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भीमराव साळुंखे

विटा (राजेंद्र काळे)

    कमळापूर ता. खानापूर येथील कमळापुर सर्व सेवा सहकारी संस्था कमळापूर च्या चेअरमन पदी भीमराव प्रभाकर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री चव्हाण व श्री कीर्दत यांनी काम पाहिले.
    कमळापूर सर्व सेवा सोसायटी मध्ये राहुल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अनिलभाऊ बाबर गटाची सत्ता आहे. आज सोसायटीच्या चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी बोलताना राहुल साळुंखे म्हणाले, या कोरोना च्या काळात सुद्धा संस्थेचे काम, वसुली एकदम व्यवस्थित आहे. संस्था प्रगतिपथावर आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने सर्व सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून कामकाज करावे व संस्थेमार्फत लवकरच आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेस नवीन इमारत व खत विभाग चालू करणार आहे, असे सांगितले. यावेळी संस्थेचे मावळते चेअरमन वसंत दादा गायकवाड, व्हाईस चेअरमन नजमा मुजावर, माजी चेअरमन दयानंद साळुंखे, संचालक सागर साळुंखे लक्ष्मण साळुंखे, धोंडीराम रेपे, अशोक यादव उपस्थित होते.
    यावेळी नूतन चेअरमन यांचा श्री पांडुरंग तात्या साळुंखे, विलास तात्या साळुंखे व राहुल साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वसंत साळुंखे सुभाष साळुंखे, रोहित साळुंखे, लक्ष्मण साळुंखे, महेश पवार, बाळकृष्ण नलवडे, विश्वास साळुंखे, पोपटराव थोरात, अजित साळुंखे, शिवाजी पवार, गोपीनाथ साळुंखे भगवान साळुंखे? लक्ष्मण शेठ साळुंखे, दस्तगीर मुजावर, रशीद मुजावर, बाबासो साळुंखे, निखिल साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments