Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील श्रीमती सरूबाई मेटकरी यांचे निधन

विटा (प्रतिनिधी)
        येथील श्रीमती सरूबाई बजरंगशेठ मेटकरी (वय 71) यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. माजी केंद्रीय अर्थमंत्री कै. स. गो. बर्वे यांचे विश्वासू सहकारी बजरंगशेठ मेटकरी यांच्या पत्नी तर माजी नगरसेवक बाळासाहेब उर्फ सुरेश मेटकरी यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
         कै. बजरंगशेठ मेटकरी यांची तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री कै. स. गो. बर्वे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. बॉम्बे बेस्टमध्ये वाहकाची नोकरी करत असताना इंटक संघटनेच्या सचिव आणि त्यानंतर अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. त्यावेळी सरूबाई मेटकरी यांनी जबाबदारीने आपल्या सर्व मुलांचे संगोपन आणि शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर पती बजरंगशेठ मेटकरी यांच्या आकस्मिक निधनानंतर आपले कुटुंब समर्थपणे चालवत प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. मेटकरी भावकीबरोबरच विट्यातील अनेक कुटुंबाबरोबर त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे विटा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
         रक्षाविसर्जन विधी सोमवारी दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विटा येथे आहे.

Post a Comment

0 Comments