Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपुरात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

इस्लामपूर ; येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या आवारात सर्व शिक्षकेतर कर्मचारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले 

इस्लामपूर (हैबत पाटील)
          शिक्षकेतर संघटनेच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीच्या शिक्षकेतर संघटनेने पुकारलेल्या लेखणी बंद आणि ठिय्या आंदोलनाला इस्लामपुरात पाठींबा देण्यात आला आहे. 
         येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या आवारात सर्व शिक्षकेतर कर्मचारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष राजन शिंदे यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे.
राज्य शासनाकडे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. 
         आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता. अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर पदांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार सुधारित वेतन लागू करावे. विविध टप्यात सेवा झाल्यानंतर लाभांची योजना लागू करावी.पाच दिवसांचा आठवडा लागू करावा.यासह अनुदानित रिक्त पदे तात्काळ भरावीत अशा मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
            मनोज मोगरे, हरिश्चंद्र चावरे , राजाराम लकेसर मुबारक पट्टेकरी, राहुल खोत, बाबासाहेब मदने, वसंत सलामे, अरुण चांदणे, युनुस आत्तार, तानाजी व राजेंद्र सावंत, विलास गिरीगोसावी, अरुण भंडारी,चंद्रकांत कुंभार, दत्ता जाधव,संभाजी व संतोष पाटील, अरुण भोई, माधुरी गोरे, मारुती शिंदे, ज्ञानदेव मंडले शामराव सुतार, राजेंद्र लोहार, जगन्नाथ गावडे आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments