Daily Mahasatta

Daily Mahasatta

माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

      नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन झालं आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९९ ते २००४च्या दरम्यान संरक्षण, विदेश आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . त्यामुळं ते सहा वर्ष कोमामध्ये होते. अखेर त्यांची मृत्यशी झुंज संपली. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांमध्ये जसवंत सिंह यांचाही सहभाग होता. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी भाजपचं प्रतिनिधित्व केलं होतं.

    पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलं
   'जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्द्यांची जगभरात एक छाप सोडली, त्यांच्या निधनानं दुःखी आहे.', असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. 

Post a Comment

0 Comments