Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना झाल्यामुळे नैराश्यातून महिलेची आत्महत्या

कडेगाव तालुक्यात कोरोना रूग्णाची आत्महत्या नैराश्यातून केली आत्महत्या

कडेगाव : सचिन मोहिते
         चिंचणी ( ता. कडेगाव ) येथील कमल गोविंद सातपूते (वय ६५ वर्ष ) या वृद्ध महिलेने विहिरीत उडी टाकुन आत्महत्या केली आहे. या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझीटीव्ह आल्यामुळे तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
        याबाबत चिंचणी -वांगी पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी, आत्महत्या केलील्या वृद्ध महिलेचा काहि दिवसापूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हापासुन वृद्ध महिला हि सतत मनाला वाईट वाटून घेत होती . यातूनच माहिलेने आज सकाळी ६ वाजणेचे सुमारास पंढरीनाथ रामचंद्र कदम यांच्या शेतातील विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली .सदर घटनेची वर्दी संतोष सुभराव सातपुते (वय३५ वर्ष ) राहणार चिंचणी यांनी दिली आहे . तसेच घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विशाल साळुंखे यांचेकडे दिला आहे . 


 

Post a Comment

0 Comments