कुपवाड मध्ये आणखी एक नगसेवक कोरोना पॉझिटिव्ह

कुपवाड, ( प्रमोद अथणीकर)
        कुपवाड शहरातील धडाडीचे नगरसेवक शेडजी मोहिते यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
          कुपवाडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मा.शेडजी मोहिते गेले कित्येक दिवसापासून लोकांची सेवा करत आहेत. त्यांच्याकडे अनेक नागरिक भेटीस किंवा काही तरी कामासाठी येत असतात. त्यांची आज डॉक्टराच्या सल्ल्याने कोरोना ऄन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसुन सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचे राहते घरी डॉक्टराच्या सल्ल्याने होम आयसोलेशन केले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन नगरसेवक मोहिते यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments