मसुचीवाडी मध्ये पाणी योजनेचे काम रखडले

मसुचीवाडी (प्रतिनिधी)
         मसुचीवाडी ता. वाळवा गावच्या पाणी योजनेच्या नविन पाईप लाईनचे काम गेले महीना भरापूर्वी सुरु झाले. गावातील लोकसंख्येच्या मानाने जास्त पाणी क्षमता असणारी व्यवस्था पूर्ण झाली. परंतु गावातील अंतर्गत पाईपलाईन चे काम झालेले नव्हते ते सुरु करण्यात आले. वाॕर्ड नंबर दोन व वस्तीभाग (डुकेवाडी) मधील ठरावीक भागात पाईपलाईन चे काम झाले आणि पुढील काम थांबले आहे.
          गावातील ज्या भागात काम झाले ते ही अपूर्णच राहीले आहे. पाईपलाईन साठी जी चर खोदण्यात आली आहे ती तशीच काही भागात राहीली आहे. त्याचबरोबर पाईपलाईन जेथे संपते तेथे योग्य प्रकारे काम पूर्ण करणे गरजेचे असते पण पाईपच्या शेवटची झाकण योग्य प्रकारे बंद न केल्याने तेथे ग्रामस्थानीच दगडे ठेऊन बंद केले आहे. याचा त्रास लोकांना होत आहे.त्याच्या वरती योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होताना दिसते.
          आजच्या कोरोना सारख्या महामारीत लोकांच्या आरोग्य विषय गोष्टींवर आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास अनेक गोष्टीना लोकांना सामोरे जावे लागेल. हे टाळायचे असेल तर ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व गोष्टीतून योग्य मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.

Post a comment

0 Comments