बाबरी मस्जीद प्रकरणी लालकृष्ण आडवाणीसह सर्व ३२ नेते दोषमुक्त, आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव

सांगली (राजेंद्र काळे)
        बाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी सीबीआय कोर्टासमोर सुरू असलेल्या केसचा सुमारे २८ वर्षानंतर निकाल लागला असून याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ३२ वरिष्ठ नेत्यांना दोषमुक्त केल्याचा निकाल देण्यात आला. त्यानंतर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
         आयोध्यातील वादग्रस्त बाबरी मस्जीद पतनानंतर भाजप व इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आरोपी केले होते. त्या प्रकरणाच्या निकालाची सर्वाना गेल्या २८ वर्षांपासून प्रतीक्षा होती. आज CBI कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय देताना मा. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यानिमित्त आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी सुधीरदादा गाडगीळ, युवा मोर्चा अध्यक्ष व नगरसेवक धीरज सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार, गजानन मगदूम, नगरसेविका कल्पना कोळेकर, सोनाली सागरे, सुजित राऊत, गणपती साळुंखे, आशरफ वांकर, गौस पठाण, आबासाहेब जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments