Daily Mahasatta

Daily Mahasatta

नवेखेड ग्रामपंचायतीच्यावतीने व्हिटॅमीन सी गोळ्यांचे वाटप

नवेखेड : ग्रामपंचायती च्या वतीने ग्रामस्थांना व्हिटॅमिन सी गोळ्या वाटप शुभारंभ करताना प्रतिक जयंतराव पाटील. समवेत डी.बी. पाटील,सरपंच प्रदीप चव्हाण,संताजी गावडे,राजेंद्र पाटील, व मान्यवर.

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
        वाळवा तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीने आपल्या गावातील कुटुंब केंद्रबिंदू मानून,त्या कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी,त्या कुटुंबाचे कोरोना पासून संरक्षण करावे,असे आवाहन युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले.
        नवेखेड ग्रामपंचायत आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबास व्हिटॅमिन सीच्या गोळ्या वाटप करीत आहे. या गोळ्या वाटपाचा शुभारंभ प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डी. बी. पाटील, सरपंच प्रदीप चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. जेष्ठ नागरिक धोंडीराम शिंदे यांना प्रथम गोळ्या वाटप करण्यात आल्या.
        सरपंच प्रदीप चव्हाण म्हणाले, आम्ही आमचे गाव एक कुटुंब मानून प्रत्येक ग्रामस्थाची योग्य काळजी घेत आहोत. ज्या काही ग्रामस्थांना कोरोनाची बाधा झाली त्यांना धीर,व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या व्हिटॅमिन सीच्या गोळ्या वाटप करीत आहोत. त्यामुळे आमच्या गावा तील नागरिक तंदुरुस्त रहाण्यास मदत होईल.
याप्रसंगी युवक कार्यकर्ते संताजी गावडे, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील,बालाजी निकम,सुभाष पाटील,दिग्विजय पाटील,युवक अध्यक्ष मदन पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments