सांगली जिल्ह्यात आजअखेर ३० हजार ७१९ पाॅझीटीव्ह

: आज एकाच दिवशी ९२४ रुग्ण कोरोना मुक्त
सांगली ता. २२ (प्रतिनिधी )
         सांगली जिल्ह्यात आजअखेर ३० हजार ७१९ रुग्णांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आले असून यापैकी २० हजार ५८८ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे तर ८ हजार ९७० रुग्णांवर सद्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.
        डाॅ. साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू आहेत. आज मंगळवार ता.२२ रोजी ६९७ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ९२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज मंगळवार ता. २२ रोजी सांगली महापालिका क्षेत्रात १५८ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर १०० तर मिरज शहरातील ५८ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ४४, जत -६४, कडेगाव - ५८ कवठेमंकाळ -६८, खानापूर - ४९, मिरज- ५३, पलूस- ५४, शिराळा- ३४, तासगाव- ३१, आणि वाळवा -८४ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यात आज २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments