Daily Mahasatta

Daily Mahasatta

नेर्लीत निविदा उघडण्यापूर्वीच ठेकेदाराकडून कामाची सुरूवात


नेर्ली ( प्रतिनिधी)
        नेर्ली (ता.कडेगाव) येथील गावात सुरू असणाऱ्या विविध विकास कामात ग्रामपंचायतीच्या परवानगी अगोदरच ठेकेदाराने विविध विकास कामांना सुरुवात केली आहे , अशी तक्रार देवेंद्र शिंदे यांनी पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडे केली आहे.
         याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांनी संगनमतानेच विनापरवाना कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये नेर्ली ता.कडेगाव येथील अंगणवाडी दुरुस्ती करणे, रोहिदास नगर येथे बंदिस्त गटार तसेच गावातील विविध ठिकाणी बंदिस्त गटार बांधकामे सुरू आहेत. याबाबतीत ग्रामपंचायतीने १३ आॅगस्ट ते २० आॅगस्ट अगोदर जाहिरात दिली होती. तसेच २७ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत मासिक मिटींग झाली आहे. मात्र सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांनी संगनमताने या कोणत्याही प्रकारची मिटींग किंवा बांधकाम कमेटीची परवानगी न घेता प्रत्यक्ष कामालाच सुरुवात केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांचे हितसंबंध आहेत. काम देण्यात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. तरी या प्रकारची चौकशी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी व पंचायत समितीच्या बांधकाम विभाग यांनी करावी. याबाबतीत तक्रारी अर्ज देवेंद्र सखाराम शिंदे यांनी केला असून या कामाची निरपेक्षपणे चौकशी करावी. अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देवेंद्र शिंदे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments