Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वांगीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

: दिलिप सुर्यवंशी यांचेहस्ते सत्कार संपन्न
कडेगाव ( सचिन मोहिते)
         कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ISO मान्यताप्राप्त सिध्दनाथ कोचिंग क्लासेसमार्फत परिक्षेस बसविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोनहिरा कारखान्याचे संचालक दिलिप सुर्यवंशी याचेहस्ते शालेय साहित्य किट व पुष्पगुच्छ देऊन डॉ . विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय येथे गौरविण्यात आले .
         एमपीएससी व युपीएससी आयोगाच्या आधारित अभ्यासक्रमावर आधारित डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद जालना यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या दुसरी ते नववी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय टॅलेंट सर्च (आर टी एस परीक्षा)२०२०महाराष्ट्र राज्याच्या निकालामध्ये कडेगाव तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये आय एस ओ मानांकन प्राप्त सिद्धनाथ क्लासेची ची इयत्ता ९ वी ची विद्यार्थींनी कु. सुविधा नामदेव सावंत हिचा राज्यात प्रथम क्रमांक तर कु. आयान फिरोज शिकलगार इयत्ता ४थी जिल्ह्यात प्रथम,कु सायली शिवाजी जाधव इयत्ता८वी जिल्ह्यात तृतीय कु . प्रिया सुरेश तांदळे इयत्ता ६ वी जिल्ह्यात तृतीय क्रमांक संपादन केले आहेत . याप्रसंगी सरपंच, उपसरपंच यांचेसह इतर ग्रामस्थ व पालक उपस्थित होते .

Post a comment

0 Comments