Daily Mahasatta

Daily Mahasatta

दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल


भावाला ठार मारण्याची धमकी

देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे  )
       भावाला ठार मारण्याची धमकी देत बोरगाव ता. वाळवा येथील एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली असून अजय राजू पाटील रा.बोरगाव ता.वाळवा याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
    याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी एकटीच घरी असताना अजय पाटील याने तिच्यावर जबरदस्ती करत वेळोवेळी शरीर सबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना जानेवारी २०२० पासून ते १९ ऑगष्ट २०२० या कालावधीत घडली आहे. पीडित मुलगी सध्या आठ महिन्यांची गरोदर आहे. ही गोष्ट आईवडील अगर कोणास सांगितली तर पीडित मुलीच्या भावास ठार मारण्याची धमकी दिली होती. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.

■■■■■■■■■■

आईला ठार मारण्याची धमकी देत
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

इस्लामपूर, ( प्रतिनिधी )
   आईला ठार मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न करून सलग पाच महिने शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी बोरगाव (ता. वाळवा) येथील वैभव नंदकुमार लोंढे (वय २४, रा. बोरगाव) याच्यावर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवती ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील रहिवाशी आहे. लोंढे याने संबंधित युवती ला जबरदस्तीने इस्लामपूर येथील मार्केट यार्डात बोलावून वारंवार तिच्यावर जबरदस्ती केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोंढे याने तिला 'तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझी बदनामी करीन व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही' अशी धमकी देऊन ८ एप्रिल ते २५ सप्टेंबर या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इस्लामपूर पोलिसांनी संशयित लोंढे याला अटक केली असून इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत. 


 

Post a Comment

0 Comments