Daily Mahasatta

Daily Mahasatta

आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


: आता पर्यंत जिल्ह्यातील ६ विद्यमान तर एक माजी आमदार कोरोना पाॅझीटीव्ह

सांगली (प्रतिनिधी)
        खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे.
      सुहासभैय्या बाबर यांनी म्हटले आहे, आपणा सर्वांचे नेते आदरणीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत भाऊंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती आहे. आदरणीय भाऊंची प्रकृती चांगली असुन ते घरीच उपचार घेणार आहेत,
        आपणा सर्वांना माहीत आहेच कोरोनाच्या काळात भाऊंनी प्रकृतीची तमा न बाळगता आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहतील. आपले आशीर्वाद, प्रेम, व सदिच्छा पाठीशी राहाव्यात ही विनंती, असा संदेश सुहास बाबर यांनी सोशल मीडियात प्रसारित केला आहे.
       सांगली जिल्ह्यातील आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, आमदार विक्रम सावंत यांच्यानंतर आता आमदार अनिल भाऊ बाबर यांना देखील कोरोना झाल्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण सहा  विद्यमान आमदारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच खानापूर आटपाडी चे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना देखील आज कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.


 

Post a Comment

0 Comments