Daily Mahasatta

Daily Mahasatta

पोलीस ठाण्यात सॅनिटायझर पिऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

जत ( नितीन टोणे)

         जत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या चोरीतील एका संशयित आरोपीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यत जत पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
         
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, जत तालुक्यातील पवनचक्की कंपनीमध्ये चोरी झाल्याच्या घटना मागील महिन्यात घडली होती. रविवारी दुपारी याच चोरी प्रकरणात जत शहरातील एका संशयित आरोपीस जत पोलिसांनी चौकशी साठी बोलावले होते. याप्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू करत त्या संबंधित संशयित आरोपीस पोलिसी खाक्या दाखविण्यास सुरुवात केली. आपणास पोलीस अटक करणार हे लक्षात येताच त्या व्यक्तीने स्वतःच्या खिशातील सॅनिटायझरची बाटली खिशातून काढून पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांनाही काहीच कळाले नाही.
          
जत पोलीस ठाण्यात एकाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा करण्याच्या प्रयत्न झाल्याची चर्चा जत पोलीस ठाण्यात दबक्या आवाजात सुरू होती. याप्रकरणी जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. नेमका हा काय प्रकार आहे? याची चर्चा जत तालुक्यात रंगली आहे. ज्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलेले होते त्या व्यक्तीने नेमके आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले ? पोलीस चुकीच्या दिशेने त्या व्यक्तीचा तपास करत होते का ? तपास बरोबर असेल तर मग आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


Post a Comment

0 Comments