Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये कोरोना मुक्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे जंगी स्वागत

कुपवाड(प्रमोद अथणीकर)

        कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली.  यावेळी कर्तव्यावर हजर होण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांचे कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले.
       कुपवाड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर  त्यांच्या वरती उपचार सुरु होते. आज ते कोरोना  मुक्त होऊन आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी कुपवाड पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी राजू अन्नछत्रे व कुपवाड पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांच्याहस्ते पुष्प गुच्छ देऊन त्या अधिकाऱ्याचे स्वागत करण्यात आले.  तसेच महिला पोलिसांनी त्यांना आरती ओवाळून  व  पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी  त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
        पोलीस ठाण्यात आपले स्वागत झाल्याने पोलीस निरीक्षक भारावून गेले होते. या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचार्यांनी आपले अनुभव सर्वांना सांगितले. कोरोनावर मात केलेल्या या कोव्हीड योद्धांच्या अनोख्या स्वागताची शहरात चांगली चर्चा होत आहे. 


 

Post a Comment

0 Comments