पेठचा ' राजा ' माणूस हरपला

: आत्मशक्ती समुहाचे हणमंतराव पाटील यांचे निधन


पेठ (प्रतिनिधी)
          आत्मशक्ती उद्योग समूहाचे संस्थापक हणमंतराव हंसाजीराव पाटील (वय 62) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 24 रोजी निधन झाले. राजकीय क्षेत्रासह सामाजिक, बँकिंग क्षेत्रात ते नेहमी अग्रभागी राहत.
           शांत, संयमी, राजकीय व्यक्तिमत्व, तरुणांचे मार्गदर्शक, आयुष्यभर ज्यांनी सामाजिक सलोखा जपला असे पेठ गावचे ते भूषण होते. काहीजण आदराने त्यांना काका म्हणून बोलावत. चार दशक राजकारणात सक्रिय असलेले काका राजकारणा पुरते राजकारण इतरवेळी समाजकारण हेच तत्व जपत.सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळींशी चांगले नाते संबन्ध निर्माण करून लोकसेवेचा वारसा  आत्मशक्ती उद्योग समूहाच्या माध्यमातून अखंडपणे सुरु ठेवला होता.
    काकांनी  आत्मशक्ती पतसंस्थेचे लावलेले रोपटे आज घडीला वटवृक्ष झाला. पारदर्शक कारभाराने संस्थेने वेगळा ठसा उमटवला. या माध्यमातून अनेक सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळाले. गावातील गोरगरीब मुलं शिकावीत म्हणून  मोठ्या कष्टातून शाळा उभी केली. आज अनेक मुलं या शाळेत आपल्या आयुष्याला आकार देत आहेत.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज गुरुवारी  24 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,मुलगी असा परिवार आहे. 


 

Post a comment

0 Comments