Daily Mahasatta

Daily Mahasatta

भाजपच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी किशोर डोंबे

: सचिवपदी रेश्मा आबासाहेब साळुंखे

सांगली (राजेंद्र काळे)
         भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी  भाजपची जम्बो जिल्हा कार्यकारणी जाहीर केले आहे. यामध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विट्याचे किशोर (काका) डोंबे, इस्लामपूर चे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सौ. रेश्मा आबासाहेब साळुंखे (कान्हरवाडी ) यांची जिल्हा सचिवपदी निवड झाली आहे.
         नुतन जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंबे हे गेल्या १० वर्षापासून भाजपात सक्रिय आहेत. सांगली जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. खानापूर आटपाडीसह ग्रामीण भागात त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे आगामी राजकीय पुनर्बांधणी करता त्यांना पक्षाने उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तर इस्लामपूर मतदारसंघात वर्चस्व असलेला नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांना देखील उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सौ रेश्मा साळुंखे यांना देखील सचिव पदाची संधी देण्यात आली आहे.
................................

भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहचविणार..
        खासदार संजयकाका पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने दिली आहे. आगामी काळात ग्रामीण भागात भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविणार आहे. शेतकरी, सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदाचा वापर करणार आहे.
            किशोर काका डोंबे
            भाजप जिल्हा उपाध्यक्ष, सांगली. 


 

Post a Comment

0 Comments