पलूस : येथील कोरोनाग्रस्त कुटुंबातील नागरिकांना वाफेच्या मशिनचे वाटप करताना शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे व शिवसैनिक.
पलूस (प्रतिनिधी)
शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पलूस शहर व पलूस तालुक्याच्यावतीने पलूस येथील शासकीय दवाखान्यांमध्ये आणि कोव्हिड सेंटर मध्ये कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना मोफत वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले. हे वाटप शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रशांत लेंगरे म्हणाले, सध्या संपूर्ण देशामध्ये करोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. महाराष्ट्र सरकार यावर उपाय करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सरकार वेगवेगळ्या संघटना, एनजीओ ना आव्हान करत आहे. आपण आपल्या परिसरातील आपल्या गावातील आपल्या घराजवळील लोकांना जास्तीत जास्त मदत करता येईल. तेवढे आपण करावी. सोशल डिस्टंसिंग पालन करावं. ही लढाई अदृश्य शत्रू बरोबर असल्याने त्यावर विजय मिळवणे थोडा अवघड आहे. परंतु कठीण नाही. सर्वांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिवसेनेच्या माध्यमातून सातत्यानं गोरगरिबांना अन्नधान्याचे किट, वाटप सॅनिटायझर, मास्क, किटचे वाटप करण्यात आले आहे.
आज जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रशांत लेंगरे (माजी तालुकाप्रमुख) प्रविण गलांडे, विशाल चव्हाण शहरप्रमुख विशाल पवार, सुरज सुर्वे, सुरज गोरड, दैवत दिवाण, अनिकेत डफाळापुरकर, रूपम महंत, गणेश वाघमारे, पै.श्रीकांत लेंगरे, इकबाल मुल्ला व शिवसैनिक उपस्थित होतो.
0 Comments