Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज ६१५ पाॅझीटीव्ह

: सलग सहा दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा
कोरोनामुक्तांची संख्या जादा

सांगली (राजेंद्र काळे )
         सांगली जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून दररोजच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळत आहे. 
       आज शनिवार ता. २६ रोजी ६१५ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर यापेक्षा जादा म्हणजेच ७२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. मात्र गेल्या सहा दिवसात ही वाढ आटोक्यात राहिली आहे तर कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत दिलासादायक वाढ होत आहे.
          आज शनिवार ता.२६ रोजी ६१५ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ७२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज ता. २६ रोजी सांगली महापालिका क्षेत्रात १३३ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर ८६ तर मिरज शहरातील ४७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ३१, जत -२८, कडेगाव - ३५ कवठेमंकाळ -४०, खानापूर - ५९, मिरज- ४९ पलूस- ३५ शिराळा- ४०, तासगाव- ५३ आणि वाळवा -११२ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
तर सांगली जिल्ह्यात आज २६रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments