Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात कोरोनाच्या समुह संसर्गाचा धोका, व्यापारी एक आठवडा दुकानं बंद ठेवणार


विटा (राजेंद्र काळे)
         खानापूर तालुक्यासह विटा शहरात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी काळात कोरोनाचा वाढणारा धोका ओळखून सराफ व्यवसायातील काही दुकानदारांनी एक आठवडाभर कडकडीत बंद पाळण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती सराफ असोसिएशनचे सचिव सुरज सावंत यांनी दिली आहे.
          सुरज सावंत म्हणाले, विटा शहर आणि तालुक्यात दररोज ६०ते ७० रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. तालुक्यात समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने देखील  विनाकारण घराबाहेर न पडणे विषयी आव्हान केले आहे.  बाजारपेठ अशीच सुरू राहिल्यास कोरोनाचा धोका आणखीन वाढण्याची शक्यता आहे, हे ओळखून आम्ही आमचे जिव्हाळा ज्वेलर्स हे दुकान ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आठवडाभर पूर्णतः बंद ठेवणार आहे.
        विटा शहरातील आणखी काही सराफ व्यवसायिकांनी देखील कोरोनाला रोखण्यासाठी आठ दिवस बंद पाळण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेतला आहे. सराफ व्यवसायासह अन्य व्यावसायिक, विक्रेते यांनी देखील स्वतःहून आपले व्यवसाय काही दिवस बंद ठेवल्यास कोरोनाच्या समुह संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो, असे मत जिव्हाळा ज्वेलर्सचे सुरज सावंत यांनी व्यक्त केले आहे.
.................................
चौकट
व्यापाऱ्यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद
        :  कोरोनाचा समूह संसर्ग चालू झाल्यामुळे विटा शहरातील सुरज सावंत यांच्यासह सराफ व्यवसायातील काही व्यापाऱ्यांनी सामाजिक भान राखत आपल्यामुळे किंवा आपल्या व्यवसायामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सुमारे आठवडाभर आपले व्यवहार स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 

Post a Comment

0 Comments