कडेगाव तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन

: कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नेर्ली/ कडेगाव (संदीप कुलकर्णी)
गत आठवड्यात कडेगाव तालुक्यातील कारंडेवाडी येथे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश भंग करून बैलगाडीच्या शर्यती आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा कडेगाव तालुक्यातील अमरापूर या गावी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी शर्यतीचे आयोजन करणारे तसेच सहभागी होणाऱ्या बैलगाडी मालकाविरुद्ध अशा एकूण अकरा जणांवर कडेगाव  पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
          रविवारी सायंकाळी वनविभागाच्या रिकाम्या जागेत हे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी शर्यत थांबून आयोजक तसेच बैलगाडी मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शर्यतीसाठी आलेली सहा वाहनेही जप्त केली आहेत. कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरापूर गावाच्या हद्दीत काही लोकांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. याबाबत राजेंद्र गणपती चिंचकर रा. मसूर ता. कराड, सयाजी बाळकृष्ण यादव रा. वाघेरी ता. कराड, अजमूद्दीन मुलानी रा.तडसर ता. कडेगाव, धोंडीराम राजाराम शिरतोडे रा. आळसंद ता. खानापूर, प्रल्हाद सदाशिव शिरतोडे रा. कमळापूर, बाबासाहेब शिरतोडे रा. आळसंद ता. खानापूर, साहिल कारंडे रा.शिरसगाव, ता. कडेगाव, शैलेश शंकर चव्हाण रा. तडसर ता. कडेगाव, प्रवीण सूर्यवंशी रा. तडसर ता. कडेगाव, सागर बबन जाधव रा. गोंदी ता. कराड, गौरव थोरवी रा. गिरीजा शंकरवाडी, ता. खटाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर घटनास्थळावरून चार टेम्पो तसेच दोन पिकप टेम्पो जप्त केले आहेत.

Post a comment

0 Comments