गार्डीत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी यात्रा कमिटीची धाव

गार्डी : यात्रा कमिटीच्यावतीने दिलेल्या दोन ऑक्सीजन मशीन आणि बेडचे लोकार्पण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर यांच्या उपस्थितीत झाले.

विटा ( राजेंद्र काळे)    

         खानापूर तालुक्यासह  जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाबाधीत रुग्णांना बेड व ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे गावातील रुग्णांना प्राथमिक उपचार गावामध्ये मिळावेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गार्डी येथील यात्रा कमिटीच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीन व पोलीस पाटील शंकर ऐवळे यांच्या वतीने बेडची व्यवस्था करण्यात आली. या ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित बाबर, उपाध्यक्ष ऋतुराज बाबर, पृथ्वीराज उद्योग समूहाचे संस्थापक सयाजीनाना बाबर, पोलीस पाटील शंकर ऐवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

         कोरोना संसर्गामुळे खानापूर तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे उपचार करणाऱ्या यंत्रणावर ताण पडत असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण बनले आहे. तसेच सांगली जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे रुग्णाच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना असणारी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत गार्डी यात्रा कमिटीच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीन व पोलीस पाटील शंकर ऐवळे यांच्यावतीने ग्रामपंचायत सभागृहात बेडची व्यवस्था करण्यात आली.

    यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित बाबर म्हणाले, कोरोना संसर्गामुळे यावर्षी गार्डीची यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यात्रा कमिटीकडे पैसे शिल्लक होते. सध्या खानापूर तालुक्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. उपचार करणाऱ्या यंत्रणावर ताण पडत असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत गावातील रुग्णांना प्राथमिक उपचार गावामध्ये मिळावेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गार्डी येथील यात्रा कमिटीच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीनची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ग्रामपंचायत सभागृहात ही व्यवस्था करण्यात आली आहे.

    यावेळी  सरपंच नेताजी बाबर, उपसरपंच बालाजी बाबर, माजी सरपंच हेमंत सूर्यवंशी, अमोल रसाळ, संजय बाबर, पप्पू  साळुंखे, काका ऐवळे, अजित साळुंखे, सतीश बाबर,  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Post a comment

0 Comments