कुपवाड मध्ये मावा न दिल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला

 

कुपवाड (प्रमोद अथणीकर)

        मावा  न दिल्याच्या राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी करण्यात आले आहे. याबाबत  कुपवाड येथे आज मंगळवार ता. १ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  शुभम कांबळे (रा. अवधूत कॉलनी कुपवाड) यांने  केतन किशोर यादव (वय 29 रा. परमानंद कॉलनी कापसे प्लॉट कुपवाड) याच्याकडे मावा मागितला होता. मात्र त्याने मावा देण्यास  नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात येऊन शुभम याने किशोर यादव  याच्यावर कोयत्याने हल्ला चढवून त्यास जखमी केले आहे. जखमी चेतन याने कुपवाड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी  गुन्हा दाखल  केला आहे. जखमीवर उपचार करण्यात आले असून अधिक तपास पोलीस काॅन्सटेबल भगत हे करीत आहेत.
Post a comment

0 Comments