Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज ८८६ कोरोना पाॅझीटीव्ह

: आज दिवसभरात ७१६ कोरोनामुक्त
सांगली  (राजेंद्र काळे)
          सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ८८६ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आज अखेरचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजार १९२ इतका झाला आहे.तर आज दिवसभरात ७१६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
         सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दररोज नवनवीन आकडे समोर येत आहेत आज रविवार ता.१३ रोजी ८८६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात २९६ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर २२६ तर मिरज शहरातील ७० रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ५१, जत -३५, कडेगाव -४९, कवठेमंकाळ -६७, खानापूर -२९, मिरज- १०७, पलूस- ६३, शिराळा- ५४, तासगाव- ६३ आणि वाळवा -७२ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
           आजपर्यंत जिल्ह्यातील २३ हजार १९२ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये १३ हजार ९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सध्या ९ हजार २४८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यातील ८५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments