कुपवाड मध्ये जनता कर्फ्यूला संमीश्र प्रतिसाद , नागरिकांची रस्त्यावर गर्दी


: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन आवश्यक. 

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
        जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांनी ११ सप्टेंबर पासून १० दिवस सांगली जिल्ह्यात जनता कर्फ्यू चे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कुपवाड मध्ये अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहेत तर रस्त्यावर देखील नागरिकांची गर्दी होत असल्याने जनता कर्फ्यूला संमीश्र प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
          कुपवाड परिसरामध्ये कालपासून जनता कर्फ्यू ची सुरुवात झाली मात्र नागरिकांना त्याचे काहीही गांभीर्य दिसून येत नाही. आज जनता कर्फ्यूच्या दुसर्या दिवशी रस्त्यावरती गर्दी चे प्रमाण वाढतच आहे. कोरोना या महाभयानक रोगाने थैमान घातले असून या रोगा वरती मात करण्यासाठी जनता कर्फ्यू ची घोषणा केली आहे. परंतु याचा विशेष उपयोग होताना दिसून येत नाही.
व्यापार वर्गातही काही दुकाने चालू काही दुकाने बंद आहेत. या मुळे गर्दी चे प्रमाण वाढतच आहे. तसेच कुपवाड मध्ये औद्योगिक वसाहत असल्याने अनेक नागरिकांची ये-जा ही चालूच आहे. मनपा क्षेत्रात एकूण कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या 9785 तर मनपा क्षेत्रात कोरोना या रोगाने एकूण मयताच्या संख्या 327 इतकी झाली असून नागरिकाच्या मध्ये याचे गांभीर्य दिसून येत नाही.
         जिल्हाधिकारी यांनी घेतलेला निर्णय नागरिकांनी पाळला पाहिजे. नागरीकांनी आपली काळजी घ्यावी. नागरिकांनी १० दिवसाचा जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळल्यास कोरोना रोग वाढण्यास आळा बसेल तसेच आरोग्य विभागातील कर्मचार्यांना देखील थोडीफार विश्रांती मिळेल. तरी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न जनता कर्फ्यू पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आव्हान मनपा चे सहाय्यक आयुक्त पराग कुडगुले यांनी केले आहे.
.................................
चौकट
जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करा. आपल्या स्वतःची व घरच्या लोकांची काळजी घ्या. तसेच आपल्यामुळे दुसऱ्याला या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्षता घ्या. तसेच प्रशासनाने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे पालन करा.

शेडजी मोहिते
नगरसेवक, सांगली मनपा.

Post a comment

0 Comments