कोव्हीड योद्धा शंकरनाना मोहिते कोरोना ' पाॅझिटीव्ह '


: संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हान

सांगली (राजेंद्र काळे)
          कोरोनाच्या भीषण संकटात लोकांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते आणि डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकरनाना मोहिते यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह  आला आहे.  त्यांची प्रकृती चांगली असून आपल्या संपर्कातील लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आव्हान शंकरनाना मोहिते यांनी केले आहे
           शंकरराव मोहिते यांनी डायमंड कल्चरल ग्रुप आणि विटा कोरोना बचाव समितीच्या माध्यमातून विटासह तालुक्यातील कोरोना बाधित लोकांना तसेच गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. नुकतेच विट्यात कोव्हीड सेंटर उभारण्यासाठी तसेच विविध रुग्णालयांना ऑक्सिजनच्या मशिनरी व अन्य साहित्य मिळवून देण्यासाठी शंकर नाना यांनी पाठपुरावा केला.
        पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर आणि विविध शासकीय अधिकार्यांसोबत बैठकीत सहभागी होऊन तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना उपचार मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील होते. आज त्यांचा कोरोना अहवाल  पाॅझीटीव्ह आला आहे. त्यांना घरीच आयसोलेशन करुन उपचार सुरू आहेत.
.............................
चौकट
लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार...
       आपल्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे घरीच आयसोलेशन करून उपचार घेणार आहे. आगामी काही दिवसात आपण तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत पुन्हा नव्या जोमाने सहभागी होणार आहोत.
         शंकर मोहिते
        अध्यक्ष, डायमंड कल्चरल ग्रुप
        विटा ( सांगली) 

Post a comment

0 Comments