मराठा आरक्षण : कडेगावात शुक्रवारी ठिय्या आंदोलन

 : तहसीलदार शैलजा पाटील यांना निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते.

कडेगाव :( सचिन मोहिते)
         सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कडेगाव येथे  मराठा क्रांती मोर्चाकडून शुक्रवार  (२५  सप्टेंबर)  सकाळी ११ ते दुपारी ३  दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व नियमांचं पालन करून हे  आंदोलनं करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने कडेगावच्या तहसीलदार डॉ.शैलजा पाटील यांना देण्यात आले . 
           सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्द करताना स्थगिती आदेश दिला आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटना तज्ञांचा व कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ  करावी. न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वी मिळालेले शैक्षणिक प्रवेश कायम ठेवावे. अशा विविध मागण्या मराठा क्रांती मोर्चा संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. 
      यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष  दादासाहेब यादव, तालुका समन्वयक राहुल पाटील , नेताजीराव  यादव , इंद्रजित साळुंखे, हिम्मत देशमुख, अँड प्रमोद पाटील, सुनील मोहिते, राजकुमार यादव , सतीश मांडके, कृष्णात मोकळे, अभिजित महाडीक, अविनाश माने आदी उपस्थित होते .

Post a comment

0 Comments