जत तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी

: सभापती तम्मंगोंडा रवि पाटील 

जत ( सोमनिंग कोळी)
जत तालुक्यात काही भागात मागील तीन चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने, बाजरी, तुर, फळबागा, जनावरांच्या चाऱ्याचे व इतर उसासह सर्वच पिके जमिनीवर पडले असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी सभापती विद्यमान सदस्य तम्मंगोंडा रवि पाटील यांनी केली आहे.
        पाटील म्हणाले की,जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.पण यंदा या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्याचबरोबर काही भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिके पाण्यात गेले आहेत. प्रशासने अश्या शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामे करावीत आणि शासनाने अश्या पीडित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची व्यवस्था करावी.
         बहुतेक शेतकऱ्यांनी खरिप पिकाचे विमा उतरविले आहे.अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा रक्कम द्यावी.तालुक्यात अनेक ठिकाणी शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांना परत पीक कर्ज देण्यास काही बँका आणि सोसायट्या टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे. अशा बँकांनी आणि सोसायट्यांची शेतकऱ्यांना वेठीस न धरता शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे. भविष्यात असे निदर्शनास आल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन सरकार विरोधात आंदोलन करण्यात येईल.

Post a comment

0 Comments