कुपवाडची गॅस शवदाहिणी बंद अवस्थेत, नागरिकातुन संताप

 

      कुपवाड ( प्रमोद अथणीकर)

     कुपवाड शहरात गॅस दाहिनी व्हावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या मागणीला अखेर १५ ऑगस्ट रोजी यश आले होते.  पण काही दिवसातच ही शववाहिनी बंद पडली आहे. त्यामुळे कुपवाड मधील नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
          आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष देत हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु दोन दिवसांपासून ही शव दहिनी बंद असल्याने नागरिकाचे हाल होत आहे . तत्कालीन सभापती संतोष पाटील यांच्या कारकिर्दीत कुपवाडच्या गॅस शव दाहिणीला मंजुरी देण्यात आली होती. कुपवाड करांसाठी गॅस दाहिणीचा गरज ओळखून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी संबधित ठेकेदाराला सदर दाहिणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुपवाड गॅस शवदाहिणीचे काम पूर्ण झाले ही होते व कुपवाड गॅस शव दाहिणीचे लोकार्पण महापौर सौ गीताताई सुतार यांच्याहस्ते करण्यात आले होते. पण काहीतरी तांत्रिक अडचणी मुळे गेली 2 ते 3 दिवस ही गॅस शव दहिनी बंद पडली असून या कडे कोण लक्ष देणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत.


Post a comment

0 Comments