Daily Mahasatta

Daily Mahasatta

धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा दाखला द्या, वाळवा तालुक्यातून मागणी

 

इस्लामपूर (हैबत पाटील)
     वाळवा तालुका धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून एसटी चा दाखला द्यावा जे आदिवासींना तेच धनगर समाजाला अशा आशयाचे निवेदन  देण्यात आले.

   यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे १) धनगर आणि धनगड दोन्ही एकच आहेत २) जे आदिवासींना तेच धनगरांना मिळावे ३) बेरोजगार युवक-युवतींना पोलीस तसेच लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे ४) मेंढपाळ कुटुंबांना जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी घराई अनुदान देण्यात यावे५) बंदिस्त शेळी मेंढी पालनासाठी जागा व अनुदान देण्यात यावे ६) ग्रामीण भागातील कुटुंबांना 10000 घरकुले बांधून  देण्यात यावेत७) स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेचे प्रमाणे स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात यावी८) विद्यार्थ्यांसाठी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद याठिकाणी मोफत वस्तीगृहाची सोय करण्यात यावी९) 2019 20 मध्ये 500 कोटी रुपये मंजूर केले होते ते धनगर समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्यात यावे१०) केंद्र सरकारच्या स्टॅन्ड अप योजनेअंतर्गत समाजातील नव उद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी मागण्या यावेळी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी  शिवाजी वाटेगावकर,राहूल टिबे, सचिन ताटे, संजय पिस्तुले, नामदेव मदने, अजित येडगे, संदीप वाकसे, विजय डांगे,योगेश हुबाले, अक्षय कोळेकर, विशाल कोळेकरअविराज ताटेआणि समाज बांधव उपस्थित होते.

 

 


Post a Comment

0 Comments